Ad will apear here
Next
होंडातर्फे पहिली ‘बीएस-सिक्स’ मोटारसायकल दाखल

नवी दिल्ली : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने वायू उत्सर्जनाबाबतच्या भारत-सहा (बीएस-सिक्स)निकषांची पूर्तता करणारी अत्याधुनिक १२५ सीसी क्षमतेची मोटरसायकल ‘एसपी१२५ बीएस-सिक्स’ दाखल केली आहे.  

याबाबत बोलताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे अध्यक्ष मिनोरु कातो म्हणाले, ‘अॅक्टीव्हा १२५ या देशातील पहिल्या बीएस-सिक्स दुचाकीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता आम्ही ‘एसपी १२५’ ही बीएस-सिक्स’ची पूर्तता करणारी  मोटरसायकल दाखल करत आहोत. त्यामुळे या श्रेणीतील तंत्रज्ञान, स्टाइल व कामगिरी यांचा दर्जा उंचावला जाणार आहे.’

होंडाची नवी मोटारसायकल दाखल करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे अध्यक्ष मिनोरु कातो व अन्य मान्यवर

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘होंडाचे दर्जेदार तंत्रज्ञान आणि या श्रेणीतील अनेक पहिलीवहिली वैशिष्ट्ये यामुळे ही नवी मोटारसायकल उत्तम कामगिरी करणार असून, ती १६ टक्के अधिक इंधन कार्यक्षम आहे. या मोटारसायकलसाठी सहा वर्षांची विशेष वॉरंटी देण्यात येत आहे.’

‘एसपी १२५-बीएस-सिक्स’ दोन प्रकारांमध्ये (ड्रम व डिस्क) आणि चार रंगांमध्ये (स्ट्रायकिंग ग्रीन, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, इम्परिअल रेड मेटॅलिक, सेरेन ब्लू) उपलब्ध असून, तिची किंमत ७२ हजार ९०० रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) पुढे आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZWICG
Similar Posts
डॉ. सायरस पूनावाला यांना बिल गेट्स यांच्या हस्ते ‘आयसीएमआर’ पुरस्कार प्रदान पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना नुकताच प्रतिष्ठित ‘आयसीएमआर जीवनगौरव पुरस्कार’ बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
‘क्विकहील’ला ‘डीएससीआय’तर्फे पुरस्कार मुंबई : क्विकहील टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘डीएससीआय एक्सलन्स अॅवॉर्ड २०१९’मध्ये नासकॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे (डीएससीआय) ‘सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट पायोनियर इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
‘टाटा प्रोजेक्ट्स’ला आयआयटी संस्थांमध्ये उदंड प्रतिसाद मुंबई : टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या व सर्वांत प्रशंसाप्राप्त संरचना कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने या वर्षी दिल्ली, मुंबई, मद्रास, कानपूर आणि खरगपूर या भारतातील आघाडीच्या पाच आयआयटी संस्थांमधून ५० इंजिनीअर्सची नियुक्ती केली आहे.
राज्यातील पहिला महिला संचालित दुग्ध व्यवसाय मावळमध्ये सुरू मावळ : संपूर्णपणे महिलांनी चालविलेला महाराष्ट्रातील पहिला दुग्ध व्यवसाय पुणे जिह्यातील मावळ तालुक्यात सुरू झाला आहे. टाटा पॉवरच्या सहकार्याने येथील महिलांनी मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनी स्थापन केली असून, याद्वारे सर्वसामान्य शेतकरी ते कृषी उद्योजिका असा मोठा टप्पा या महिलांनी पार केला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language